रत्नागिरी:- तालुक्यातील नांदिवडे येथील जेएसडल्ब्यू कंपनीच्या कामगार वसाहतीच्या पाण्याच्या टाकीजवळ गांजा या अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या संशयिताविरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवार 11 सप्टेंबर रोजी रात्री 9.30 वा.सुमारास करण्यात आली.
पवन कुमार भविषण यादव (43,मुळ रा.बिहार सध्या रा. नांदिवडे,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस शिपाई प्रितेश लोटणकर यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, शुक्रवारी रात्री संशयित हा नांदिवडे येथील जेएसडल्ब्यू कंपनीच्या कामगार वसाहतीच्या पाण्याच्या टाकीजवळ गांजा या अमली पदार्थाचे सेवन करत असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात एन.डी.पी.एस ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









