रत्नागिरी:- खोल समुद्रातील मासेमारी व्यवसाय उद्या 1 जून ते 31 जुलैपर्यंत बंद होता. पावसाळी हंगामामुळे दोन महिन्यांसाठी खोल समुद्रातील मासेमारीसाठी असलेली बंदी उठणार आहे. 1 ऑगस्टपासून या मासेमारी हंगामाला प्रारंभ होणार असल्याने बंदरांमध्ये मच्छीमार सज्ज झालेला आहे. गुरुवार १ ऑगस्ट पासून नव्या मासेमारी हंगामाचा मच्छिमार मुहुर्त साधण्यासाठी सज्ज झाले असले तरी गटारी अमावस्येला मच्छीमार मुहूर्त साधणार की मच्छीमारांचा मुहूर्त हुकणार याकडे नजरा लागल्या आहेत.
महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 व सुधारणा अध्यादेश 2021 अन्वये 1 जून 2022 ते 31 जुलै 2022 (दोन्ही दिवस धरुन 61 दिवस) या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय सागरी क्षेत्रात यांत्रिक नौकांनी मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली होती.
ही पावसाळी मासेमारी बंदी यांत्रिक मासेमारी नौकांना लागू करण्यात आलेली होती. पावसाळी मासेमारी बंदी ही पारंपारिक पध्दतीने मासेमारी करणाऱया बिगर यांत्रिकी नौकांना लागु नव्हती. ही शासनस्तरावरून घालण्यात आलेली मासेमारी बंदी उठल्यानंतर आज 31 जुलैपर्यत आहे. उद्या 1 ऑगस्टपासून मासेमारी हंगामाला प्रारंभ होत आहे. पण समुद्रातील शांत वातावरणाची मच्छिमारांना प्रतिक्षा लागून राहिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणातील पावसी उघडीप पाहता या मासेमारी हंगामासाठी मािछमार सज्ज झालेले आहेत.









