रत्नागिरी:- धनादेश बॅंकेत न वठल्याप्रकरणी न्यायालयाने संशयिताला दोन वर्षे सक्तमजूरी तसेच २५ हजार दंड, दंड न भरलेस तीन महिने साधी कैद तसेच नुकसान भरपाई पोटी धनादेशाची रक्कम ३ लाख व त्यावर धनादेशाचे तारखेपासून शेकडा १८ टक्के व्याज फिर्यादीला देण्याची शिक्षा ठोठावली.
आसिफ हसनमियॉ सोलकर (रा. पेठकिल्ला, रत्नागिरी) यांनी असे संशयिताचे नाव आहे. ही घटना ३१ मे २०१६ ला घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार नुरजहॉ खलील होडेकर (रा. मिरकरवाडा-रत्नागिरी) यांनी संशयित आसिफ सोलकर यांना ३ लाख रुपये व्यवसायिक अडचणीसाठी हातउसने दिले होते. त्यावेळी लेखी करार करण्यात आला होता. रक्मेची परतफेडीसाठी संशयित सोलकर यांनी २२ जानेवारी २०१८ ला दीड लाख रुपयांचे दोन धनादेश श्रीमती होडेकर यांना दिले होते. धनादेश बॅंकेत वठविण्यासाठी टाकले असता ते पुरेशी रक्कम नसल्यामुळे वटले नाहीत. त्यामुळे होडेकर यांनी संशयित सोलकर यांच्या विरुद्ध न्यायालयात धनादेश वठला नसल्याची खटला दाखल केला. त्यामध्ये पुराव्या अंती सोलकर यांना न्यायालयाने दोषी ठरवून दोन वर्ष सक्तमजूरी व २५ हजाराचा दंड, दंड न भरलेस तीन महिने साधी कैद तसेच नुकसान भरपाई पोटी धनादेशाची रक्कम ३ लाख व त्यावर धनादेशाचे तारखेपासून व्यावसायिक शेकडा १८ टक्के व्याज श्रीमती होडेकर देण्याची शिक्षा ठोठावली









