दुचाकी चोरी प्रकरणी भंगार व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:- दुचाकी चोरुन आपल्या भंगाराच्या दुकानात ठेवणार्‍या संशयिताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार 2 ऑगस्ट रोजी दुपारी 1.15 वा.सुमारास करण्यात आली.

तानाजी बाबासो गोसावी (41,रा. रहाटाघर झोपडपट्टी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित भंगार विक्रेत्याचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हवालदार अमोल भोसले यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, शनिवारी दुपारी ते जयस्तंभ ते पेठकिल्ला अशी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी त्यांना रहाटाघर बसस्थानकासमोरील भंगार दुकानात एक दुचाकी दिसून आली. त्यांनी दुकान मालक गोसावीकडे त्याबाबत चौकशी केली असता त्याच्याकडे गाडीची कोणतीही कागदपत्रे नव्हती. तसेच तो उडवा-उडवीची आणि असमाधानकारक उत्तरे देत होता. त्यावरुन त्याने ती चोरीची दुचाकी आणली असल्याची पोलिसांची खात्री झाली. संशयिताविरोधात महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 124 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.