पावस ः दाभिळे-आंबेरे येथे नारळाच्या बागेत मोलमजुरी करण्यासाठी गेलेल्या महिलेला तुमसरीन माश्याचे पोळावर पाय पडला. पोळ्यातील माश्यांनी तिच्या शरिरावर ठिक-ठिकाणी चावा घेतला. उपचारासाठी तिला प्राथमिक आरोग्य केंद्र पावस येथे दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरु असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले.
संजीवनी संजय कुड (वय ४०, रा. दाभिळ-आंबेरे, कुडवाडी, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता.१०) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संजीवनी कुड या दाभिळ आंबेरे येथील राजेश पाटणकर यांच्या नारळाच्या बागेत कामाला गेल्या होत्या. बागेत काम करताना तिचा तुमसरीन माश्यांच्या पोळावर पाय पडला. त्यातील माशांनी तिच्या शरिरावर ठिक-ठिकाणी चावा घेतला. उपचारासाठी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र पावस येथे दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









