चिपळूण:- वालोपे रेल्वेस्थानक परिसरातील टपरीवर गांजाची विक्री करणाऱ्या तरुणाला 3 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी अटक केली. गणेश परशुराम साळवी (52, मूळगाव माणगाव-रायगड, सध्या वालोपे-बौध्दवाडी) असे त्याचे नाव आहे.
3 ऑक्टोबर रोजी रात्री 11.45 वाजता चिपळूण पोलिसांच्या पथकाने येथे छापा मारला. यावेळी टपरीत 10 हजार 750 रूपये किमतीचा 439 ग्रॅम ओला गांजा आढळून आला. गांजा जप्त करीत आरोपीला अटक करण्यात आली. याची फिर्याद सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप साळुंखे यांनी दिली असून अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक रूपाली पाटील करीत आहेत.