झाडगाव येथील प्रौढाची ९३ हजाराची ऑनलाइन फसवणूक

रत्नागिरी:- सोशल मिडियाच्या व्हॉटसॲपवर आलेली लिंक ओपन करुन त्यामध्ये माहिती भरली असता अज्ञाताने बॅंक खात्यातून ९३ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अजित सदानंद पिलणकर (वय ५०, रा. पुष्पेंद्र कॉम्प्लेक्स, शेरेनाका, झाडगाव-रत्नागिरी) असे ९३ हजाराची फसवणूक झालेल्या प्रौढाचे नाव आहे. ही घटना २२ ते २५ सप्टेंबर २०२५ सायंकाळी साडेपाच च्या सुमारास रमा विठ्ठल अपार्टमेट, राधाकृष्ण टॉकिज समोर-रत्नागिरी येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी अजित पिलणकर हे २५ सप्टेंबरला सिनेमाच्या तिकीट बुकींग बाबत माहिती घेत होते. त्याचवेळी त्यांच्या मोबाईलच्या व्हॉटसअॅपवर आलेली लिंक ओपन करुन माहिती भरली. त्यानंतर फिर्यादी यांच्या बॅंक ऑफ इंडियाच्या वीर सावरकर चौक या शाखेतून पिलणकर यांच्या खात्यातून सुरवातील ८ हजार व त्यानंतर ८५ हजार असे एकूण ९३ हजार रुपयांची अज्ञाताने फसवणूक केली. या प्रकरणी अजित पिलणकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.