रत्नागिरी:- जिल्ह्यात नव्याने 503 तर त्यापूर्वीचे 94 असे एकूण 597 पॉझिटिव्ह कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. नवे 597 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 60 हजार 642 वर गेली आहे. जिल्ह्यात आज 12 मृत्यूंची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मागील काही कालावधी पासून जैसे थे असल्याचं चित्र आहे. काही प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी अधिक होत असली तरी कोरोना पॉझिव्हिटी रेट स्थिर आहे. जिल्ह्यात मागील 24 तासात 5 हजार 440 चाचण्या करण्यात आल्या आहेत. यात 503 जण बाधित सापडले आहेत. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 9.25 टक्क्यांवर पोहचला आहे. आरटिपीसीआर चाचणी केलेल्या 2 हजार 617 पैकी 298 तर अँटीजेन चाचणी केलेल्या 2 हजार 823 पैकी 285 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यात 24 तासात 12 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 733 मृत्यू झाले आहेत. जिल्ह्याचा मृत्यूदर 2.86 टक्के आहे. जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू रत्नागिरी तालुक्यात आज 3 तर आतापर्यंत 564 मृत्यू, चिपळूण 339, संगमेश्वर तालुक्यात 151, खेड तालुक्यात 165 मृत्यू झाले आहेत. सर्वात कमी मृत्यू मंडणगड तालुक्यात केवळ 24 झाले आहेत.









