जिल्ह्यात एकही अहवाल प्रलंबित नाही

रत्नागिरी:- जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 22 हजार 358 नमुने तपासण्यात आले असून सर्व 22 हजार 358 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 3018 अहवाल पॉझिटीव्ह आले असून 19 हजार 328 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. 

मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्हयातून  आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. मंगळवार अखेर होम क्वारंटाईन खाली असणाऱ्यांची संख्या 43 हजार 303 इतकी आहे.