जिल्ह्यातील 26 हजार 485 ग्रामस्थांना पाणी टंचाईच्या झळा

रत्नागिरी:- जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा दिवसागणिक तीव्र होउ लागल्या आहेत. वाढत्या उन्हाळय़ाच्या तडाख्याने दिवसागणिक पाणीटंचाई ग्रस्त गावांच्या संख्येत भर पडू लागली आहे. सद्या जिल्ह्यात रत्नागिरीसोबत चिपळूण आणि मंडणगड या तालुक्यात पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये वाढ होताना दिसत आहे. या तीन तालुक्यातील एकूण 20 गावांतील 64 वाडय़ांतील 26 हजार 485 ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

उन्हाळय़ाचा रखरखाट आणखीनच उग्र होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पाणीटंचाईग्रस्त गावांतील ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू झालेली आहे. या टंचाईग्रस्त वाडय़ांना टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी प्रशासनस्तरावरून धावपळ सुरू झाली आहे. यावर्षी सुरूवातीला रत्नागिरी तालुक्यात पाणीटांईने डोक वर काढलेले होते. पण आता चिपळुण आणि मंडणगड या दोन तालुक्यांतही या पाणीटंचाईने ग्रासले आहे. तेथील ग्रामस्थांची तहान भागवण्यासाठी टँकरच्या फेर्‍या सुरू झालेल्या आहेत.

रत्नागिरीतील 8 गावांतील 26 वाडय़ां-वस्त्यांमधील 22 हजार 393 ग्रामस्थांना 10 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तर चिपळूण तालुक्यात 7 गावातील 14 वाडय़ांमधील 1 हजार 176 ग्रामस्थांना पाणीपुरवठय़ासाठी एक टँकर धावत आहे.

मंडणगडमध्ये 3 गावांतील 3 वाडय़ांना एका टँकरद्वारे पाणीपुरवठा प्रशासनस्तरावरून सुरू करण्यात आला आहे. खेडमध्ये 7 गावांतील 11 वाडय़ांतील 668 ग्रामस्थांना एका टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. दिवसागणिक जिल्ह्य़ातील वाढत्या तापमानामुळे पाणीपातळीत घट होवू लागली आहे. परिणामी पाणी टंचाई उग्ररुप धारण करण्याची चिन्हे उभी ठाकली आहे.

जिल्हय़ातील टांईग्रस्त गावे व वाडय़ाः
रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक वाडय़ा व वस्त्यां समावे आहे. त्यात शिरगांवमध्ये राधाक्ष्णनगर, तिवंडेवाडी, स्वापानंदनगर, अजमेरीनगर, राजनगर, प्रशांतनगर, आझादनगर, नायाबनगर, लक्ष्मीनगर, साईभूमीनगर. सडामिऱया येथे सोपीवाडी, गवाणवाडी, मधलावठार, खालावठार, मिऱयाबंदर, आनंदनगर यां समावेश आहे. खालगावमध्ये बौध्दवाडी, मधली गोताडवाडी, जाकादेवी बाजारपेठ. मेर्वी गावात वरी म्हादयेवाडी, विठ्ठलवाडी. मिरजोळे येथे मधलीवाडी, भक्तीकुंज वसाहत, एलिना वसाहत, स्मितप्रभा वसाहत. नाणे येथे आदिनाथ नगर यां समावेश आहे. सोमेश्वर मध्ये पाळंदवाडी, गुरववाडी. खेडशी गावात नवाथेनगर, श्रीनगर, एकतानगर, गणेशनगर, लक्ष्मीनारायण वसाहत, मथुरापार्क, सरस्वतीनगर, सौम्यापार्क . मंडणगडमध्ये वाल्मिकीनगर, कोडगाव, भोळवलीतील देवा डोंगर. खेडमध्ये कशेडीमध्ये बोरटोक, बंगळा, खवटीतील खाली धनगरवाडी, वरी धनगरवाडी, घेरारसाळगड भराडे धनगरवाडी, निमणी धनगरवाडी, सवेणी-धनगरवाडी, केळणेतील भोसलेवाडी, मांगलेवाडी, तळे-धनगरवाडी, कासई-बोरवाडी. चिपळूणमध्ये डेरवणातील धनगरवाडी, चव्हाणवाडी, कातळवाडी, कुडूप-धनगरवाडी, कातळवाडी, मधलीवाडी, मोकासवाडी, अनारीमध्ये धनगरवाडी, कोंडमळा-धनगरवाडी, नारळेवाडी, राडेवाडी, अडरे-धनगरवाडी, सावर्डे-धनगरवाडी, टेरव-धनगरवाडी.