रत्नागिरी:- जिल्ह्यात यावेळेस पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) पूर्व माध्यमिक (इयत्ता आठवी) शिष्यवृत्ती परिक्षेसाठी एकूण 13 हजार 323 विद्यार्थी परिक्षा देणार आहेत. आज 18 फेब्रुवारी रोजी ही परीक्षा होत असून या परीक्षेसाठी जिल्ह्यात एकूण 140 केंद्रांवर बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी या परिक्षेला स्पर्धा परीक्षेइतकेच अलिकडे महत्व पाप्त झालेले आहे. त्यामुळे या परीक्षेसाठी बसणार्या विद्यार्थ्यांमध्ये मोठी चढाओढ पहायला मिळत आहे. राज्यात एकाच दिवशा आज 18 फेब्रुवारीला ही परीक्षा होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी (इयत्ता आठवी) 1 हजार 797 शाळांमधील 5 हजार 137 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षेसाठी 49 केंद्रांवर बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
तर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी (पाचवी) 1 हजार 797 शाळांमधील 8 हजार 186 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. 91 केंद्रांवर बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात शिष्यवृत्ती परिक्षेसाठी गतवर्षीपेक्षा यावर्षी संख्येत वाढ झाली आहे. गतवर्षी 2023 मध्ये 4 हजार 794 विद्यार्थी बसले होते. यावर्षी 2024 साठी मात्र ही संख्या 5 हजाराच्या घरात गेली आहे.