जिल्हा पोलिस दलातील २५८ जणांच्या बदल्यांचे आदेश

रत्नागिरी:- अधीक्षक नितीन बगाटे यांनी पोलीस दलातील विविध संवर्गातील एकाचवेळी तब्बल २५८ बदल्या त्यामध्ये १२ जणांच्या जिल्ह्याबाहेर बदली करण्यात आली आहे.

नुकताच जिल्ह्याचा पोलीस स्वीकारलेल्या पोलीस अधीक्षक बगाटे यांनी आधी खात्यामध्ये सुनियंत्रण आणण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी जिल्हा पोलीस दलाच्या अस्थापनेवरील सहायक पोलीस फौजदार, पोलीस हवालदार, पोलीस नाईक तसेच पोलीस शिपाई या संवर्गातील सर्वसाधारण बदल्या करण्यात केल्या आहेत. या सर्वसाधारण बदत्यांची कार्यवाही करण्यासाठी जिल्हा स्तरावर आस्थापना मंडळ गठित करण्यात आली होती, ज्याचे अध्यक्ष स्वतः पोलीस अधीक्षक श्री. बगाटे हे होते तसेच सदस्य म्हणून अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड व प्रभारी पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) श्रीमती. राधिका फडके तसेच सदस्य सचिव म्हणून प्रभारी कार्यालय अधीक्षक श्रीमती श्रद्धा तळेकर यांनी काम पहिले.

बदल्या करताना वशिला किंवा सहानुभूती या गोष्टींना बाजूला करत पोलीस अधीक्षकांनी या सहायक पोलीस फौजदार, पोलीस हवालदार, पोलीस नाईक तसेच पोलीस शिपाई या संवर्गातील सर्वसाधारण बदल्या ह्या त्यांच्या समक्ष पारदर्शक तसेच समुपदेशन द्वारे केल्या. यासाठी बदलीस पात्र कर्मचाऱ्यांना बदली करिता दिलेल्या पसंती क्रमांचा प्रशासकीय दृष्ट्या विचार करून बदलीबाबत आस्थापना मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार त्वरित प्रभावाने बदली करण्यात आलेली आहे.

अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या झालेल्या बदत्त्यांमध्ये प्रशासकीय बदल्यामध्ये सहायक पोलीस फौजदार पदाच्या 30, पोलीस हवालदार पदाच्या 72, पोलीस नाईक पदाच्या 04, पोलीस शिपाईपदाच्या 113 बदल्या करण्यात आल्या. चालक संवर्गातील बदल्यामध्ये पोलीस हवालदार पदाच्या 15, पोलीस नाईक पदाच्या 01, पोलीस शिपाई पदाच्या 11 बदल्या करण्यात आल्या. अंतर जिल्हा बदल्या मध्ये पोलीस हवालदार 01, पोलीस नाईक 02 आणि पोलीस शिपाई पदाच्या ०१ जणांच्या बदल्या करण्यात आल्या.