जिल्हाधिकारी कार्यालयात 36, तहसिल कार्यालयात 2; एकूण 38 जण पॉझिटिव्ह

रत्नागिरी:- जिल्हाधिकारी कार्यालयातील व तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचणी करण्यात आली होती. यापैकी 38 जण पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. सापडलेल्या 38 बाधितांपैकी 36 जण जिल्हाधिकारी कार्यालयातील तर 2 जण तहसीलदार कार्यालयातील आहेत.

अत्यंत वेगाने कोरोना संक्रमण वाढत असून सर्वांनी अत्यंत काटेकोरपणे कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सापडलेल्या 38 पैकी 36 जण जिल्हाधिकारी कार्यालयातील तर 2 जण तहसीलदार कार्यालयातील आहेत. जिल्ह्यातील आणि तालुक्यातील महत्त्वाच्या प्रशासकीय, महसूल कामासंदर्भात अनेकांचा या कार्यालयाशी संपर्क येतो. म्हणूनच या प्रमुख शासकीय कार्यालयात इतक्या मोठ्या प्रमाणावर पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.