जयगड येथे शेतकऱ्याचे घर फोडत २५ हजारांची चोरी

रत्नागिरी:- तालुक्यातील रिळ-भंडारवाडी येथील शेतकऱ्याच्या घराचा पुढील दरवाजाची कडी कोयंडा उचकटून चोरट्याने घरफोडी केली. घरात प्रवेश करुन कपाटाच्या लोकरमधील २५ हजाराची रोख रक्कम चोरट्याने पळविली. जयगड पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी ते बुधवारी (ता. ८) सकाळी पावणे आठच्या सुमारास रिळ भंडारवाडी येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी अमर वसंत चव्हाण (६७, रा. रिळ-भंडारवाडी, ता. रत्नागिरी) यांचे भंडारवाडी येथे घर आहे. चोरट्याने घराचे पुढील दरवाजाचे कोयंडा कोणत्यातरी हत्याराने तोडून लागडी दरवाजाचे चौकटीला लॅचची असलेली कडी उचकटून घरात प्रवेश केला. बेडरुममधील असलेले लोखंडी कपाटाच्या दरवाजा कोणत्यातरी हत्याराने उचकटून लॉकरमधील २५ हजाराच्या रोख रक्कमेवर डल्ला मारला. तसेच चव्हाण यांच्या शेजारी रहाणारे मुंबई स्थित यांच्या घराचा दरवाजा उचकटून घरात प्रवेश करुन घरातील कपाटातील साहित्य व कपडे अस्ताव्यस्त करण्याचा प्रयत्न करुन पसार झाले. या प्रकरणी अमर चव्हाण यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास जयगड पोलिस अमंलदार करत आहेत.