Friday, July 31, 2026
spot_img
Home गुन्हेगारी जनावरांची अवैध वाहतूक करताना दोघांना अटक

जनावरांची अवैध वाहतूक करताना दोघांना अटक

दापोली येथील घटना; पिकअप गाडीसह ३ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त

दापोली:- दापोली तालुक्यातील सोवेली येथे कत्तलीच्या इराद्याने क्रूरपणे जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघा जणांना दापोली पोलिसांनी रंगेहात पकडले असून त्यांच्याकडून एकूण ३ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जुलै रोजी रात्री ८:३० वाजता सोवेली ज्ञानेश्वरी स्टॉप ता. दापोली येथे बैल, गाय आणि पाडी यांची अवैध वाहतूक करताना महमद कादीर पोवेकर (वय ३५, रा. मुमुर्शी मुस्लिम मोहल्ला, ता. महाड, रायगड), तसलीम हुसैन जोगीलकर (वय ३२, रा. दहागाव मोहल्ला, मंडणगड) यांच्यावर कारवाई करण्यात आली. राजेंद्र रामचंद्र फणसे (सोवेली सावंतवाडी, ता. दापोली) यांच्या फिर्यादीनुसार प्राण्यांचा छळ अधिनियम १९६०, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६, प्राण्यांचे परिवहन नियम आणि भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

​आरोपींनी महिंद्रा बोलेरो पिकअप गाडीमध्ये (क्र. एम.एच.०६. सी.पी.०८५८) बैल, गाय आणि पाडी यांना वेदना होईल अशा रीतीने अखूड दोरीने बांधून कत्तलीसाठी नेत असताना ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना दिनांक २९ जुलै रोजी अटक केली आहे.