Monday, November 16, 2026
spot_img
Home मंडणगड चालत्या वाहनातून पडून तरुणाचा मृत्यू

चालत्या वाहनातून पडून तरुणाचा मृत्यू

मंडणगड:- चिरे वाहतूक करून परतत असताना अचानक आकडी आल्याने चालत्या एलपी वाहनातून रस्त्यावर पडून प्रशांत सुंदर चिरगुटकर (वय ३६, रा. शेनाळे) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. १५) सकाळी राष्ट्रीय महामार्गावरील पन्हळी खुर्द येथे घडली.

मोहन रामा जाधव (वय ४१, रा. सालीवाडा) हे एलपी वाहनातून चिरे वाहतूक करून परतत होते. यावेळी वाहनातील प्रशांत याला अचानक आकडी आल्याने त्याच्या बाजूचा दरवाजा उघडला गेला आणि तो चालत्या वाहनातून रस्त्यावर पडला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला भिंगळोली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी प्रदीप जाधव यांच्या फिर्यादीवरून वाहनचालक मोहन जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलिस निरीक्षक भरत धुमाळ तपास करीत आहेत.