Friday, September 4, 2026
spot_img
Home गुन्हेगारी चांदराई बाजारपेठेत जुगार अड्ड्यावर कारवाई

चांदराई बाजारपेठेत जुगार अड्ड्यावर कारवाई

ग्रामीण पोलिसांकडून ४४७ रुपयांचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी:- जिल्ह्यातील चांदराई बाजारपेठ मुख्य रस्त्याजवळ असलेल्या पिकअप शेडच्या मागील बाजूस पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना ‘मधूर’ नावाचा जुगार चालवणाऱ्या एकावर रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे. ही कारवाई बुधवार, दिनांक २ सप्टेंबर रोजी सायंकाळी १९.१६ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस हवालदार संकेत बळाराम महाडिक (वय ३५, नेमणूक रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे, बक्कल नं. १२४) यांनी फिर्यादी दिली असून, त्यावरून पोलिसांनी आरोपी संतोष विश्वनाथ सुर्वे (वय ३६, रा. भंडारवाडी चांदेराई, ता. जि. रत्नागिरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष सुर्वे हा आपल्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लोकांकडून पैसे स्वीकारून विनापरवाना ‘मधूर’ नावाचा जुगार खेळ चालवत असताना पोलिसांना रंगेहात मिळून आला. पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण ४४७ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये ४२० रुपये रोख रक्कम आणि जुगाराचे इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १९१/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे दिनांक २ सप्टेंबर रोजी रात्री २२.१७ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.