चरवेलीत बिबट्या पडला विहिरीत

रत्नागिरी:- तालुक्यातील चरवेली स्टॉप नजिक राजेंद्र कुरतडकर यांच्या विहिरीत बिबट्या पडला. रात्री भक्षाचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडल्याची शक्यता असून सकाळी विहिरीतून बिबट्याचा आवाज आल्यानंतर कुरतडकर यांनी विहिरीत पाहिल्यानंतर विहिरीत बिबट्या असल्याचे निदर्शनास आले. या बिबट्याला काढण्यासाठी वन खात्याची टीम घटनास्थळी पोहचली असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पावस येथून पिंजरा मागवण्यात आला आहे.