रत्नागिरी:- मुंबई ते सिंधुदुर्ग या सहा पदरी ग्रीनफिल्ड कोकण एक्स्प्रेस वेच्या कामासाठी शंभर मीटर रूंद भूसंपादनाला शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे 388.45 किलोमीटरच्या महामार्ग उभारणीला वेग येणार आहे. हे काम चार टप्प्यांमध्ये होणार आहे. हा महामार्ग नवी मुंबई येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळास जोडला जाणार आहे.
कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हा सहा पदरी महामार्ग जोडला जाणार असून त्याचे बांधकाम चार टप्प्यांत करण्यात येणार आहे. त्यामुळे हा महामार्ग कोकणाच्या पर्यटन विकासालाही नवा आयाम देणारा ठरणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) या महामार्गासाठी अंमलबजावणी संस्था म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यानुसार एमएसआरडीसीने या महामार्गासाठी विविध पर्यायी आखणींचा अभ्यास करून चार टप्प्यातील अंतिम आखणी प्रस्ताव सादर केला आहे. या महामार्गावर ताशी 100 किलोमीटर वेगाने प्रवास करता येणार आहे.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जोडणारा मुंब ते सिंधुदुर्ग असा ग्रीनफिल्ड कोकण द्रुतगती मार्ग उभारण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आला.त्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबतचा शासननिर्णय प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार प्रवेश नियंत्रित सहापदरी ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्ग बांधणे, 100 कि.मी. प्रतितास वेगासाठी महामार्ग संकल्पित करणे, महामार्गासाठी 100 मीटर रूंद भूसंपादन करण्यास मान्यता देण्यात आले आहे. हा महामार्ग नवी मुंब येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळास जोडला जाणार असल्याने कोकणातून आंतरराष्ट्रीय प्रवास सोयीचा होणार आहे. हा मार्ग कोकणपट्ट किर्नाघ्याजवळून करण्यात येणार असल्याने तो पर्यटनाच्या दृष्टीने भर घालणारा ठरणार आहे.
पेण (बळवली गाव) ते रायगड, रत्नागिरी जिल्हा सीमा : 95.40 कि.मी. रायगडरत्नागिरी जिल्हा सीमा ते गुहागरचिपळूण (रत्नागिरी जिल्हा) : 69.49 कि.मी. गुहागरचिपळूण (रत्नागिरी जिल्हा) ते रत्नागिरीसिंधुदुर्ग जिल्हा सीमा : 122.81 कि.मी. रत्नागिरीसिंधुदुर्ग जिल्हा सीमा ते पत्रादेवी महाराष्ट्रगोवा राज्य सीमा : 100.84









