रत्नागिरी:- बेकायदेशीररित्या गुरांची कत्तल करणाऱ्या मुंबई येथील सराईत आरोपीच्या मुसक्या आवळण्यात रत्नागिरी पोलीसांना यश आले आहे. जानेवारी २०२२ मध्ये बोरज, ता.खेड, जि.रत्नागिरी येथे मुंबई-गोवा हायवेच्या पूलाजवळ झाडेझुडपांमध्ये जनावरांचे अवशेष मिळूण आले होते. सदर ठिकाणी मिळालेल्या अवशेषांची पशुवैद्यकीय अधिकारी यांचेकडून तपासणी करून घेतली असता मिळलेले अवशेष हे गोवंशीय जनावरांचे असल्याचे निदर्शनास आल्याने त्याबाबत खेड पोलीस स्टेशन येथे भादवि.क ४२९, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५(अ)(ब), ९ प्रमाणे अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक, डॉ. श्री. मोहित कुमार गर्ग, यांनी घटनेचे गांर्भीय पाहून या संवेदनशील गुन्ह्यातील आरोपीला अटक करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने खेड पोलीस ठाणे सोबत समांतर तपासाकरीता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सपोनि/प्रविण स्वामी यांचे अधिपत्याखाली पोहेकॉ/सागर साळवी, पोहेकॉ/विजय आंबेकर, पोना/योगेश नार्वेकर यांचे विशेष पथक तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरी चे पथक तयार करण्यात येऊन समांतर तपास सुरू होता. या तपास पथकास तपासा दरम्यान पुर्वी अशाप्रकारचे गुन्हे करणा-या व मुंबई येथे राहणा-या एका संशयित इसमाची माहिती प्राप्त झाली. सदर संशयिताची खात्रीलायक माहिती असल्याने गुन्हे अन्वेषण पथकाने त्यास खेड पोलीस ठाणे येथे आणून चौकशी केली, चौकशी दरम्यान संशियताने बोरज ता. खेड येथील गुन्हा अन्य इतर साथीदारांचे मदतीने केल्याचे कबूल केले असल्याने त्यास खेड पोलीसांनी अटक केली आहे व सदरचा गुन्हा उघडकीस आलेला आहे.
सदर आरोपी हा सराईत असून त्याचेवर अशाच प्रकारचे गुन्हे खालापूर पोलीस ठाणे जि. रायगड येथे ०२ व नाशिक येथे ०१ गुन्हा दाखल आहे.
सप्टेंबर – २०२० पासून रत्नागिरी पोलीस दलाचा पोलीस अधीक्षक, डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी पद्भार घेतल्यापासून जनावरांच्या चोरटया वाहतुकीवर विशेष लक्ष केंद्रित करुन जिल्हयातील वाहतुकीचे प्रमुख मार्गांच्या ठिकाणी असलेल्या चेकपोस्ट तसेच इतर ठिकाणी नाकाबंदी प्रभावीपणे कार्यरत केली. रत्नागिरी जिल्हयामध्ये नाकाबंदीची अंमलबजावणी प्रभाविपणे करत जनावरांच्या चोरटी वाहतुक करणारी वाहने ठिक-ठिकाणी पकडून आतापर्यंत जिल्हयात खालील तक्त्याप्रमाणे यशस्वी कारवाई केलेली आहे. पोलीस अधीक्षक यांचेकडून दरमहा या केसेसचा जिल्हास्तरावर विशेष आढावा घेतला जातो. यामुळे अवैध गुरे व मांस वाहतूक संबंधीत सर्व गुन्ह्यातील आरोपी अटक करण्यात आल्याने सन २०२१ व २०२२२ मधील दाखल सर्व गुन्हे उघडकीस आणले आहेत. यामुळे जनावरांची चोरटी वाहतुक करणा-या व्यक्तिंना चांगलीच चपकारक बसली आहे सदरची कारवाई प्रभाविपणे यापुढेही अशीच चालू रहाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिलेली आहे.