खेड:- मुंबई – गोवा महामार्गावरील दाभिळ नजीक ७० हजार रुपये किंमतीच्या गुटखा वाहतूकप्रकरणी येथील पोलिसांनी जेरबंद केलेल्या फरहान फारुख मोहम्मद पटेल (गोवळकोटरोड- चिपळूण) यास तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
गुटखा विक्री प्रकरणाचे नेमके ‘कनेक्शन’ शोधून काढण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. फरहान पटेल हा आपल्या ताब्यातील एम. एच.०२/बी.जे. ३३२९ क्रमांकाच्या मारुती सुझुकी गाडी मधून गुटखा वाहतूक करत असताना पोलिसांच्या तपासणी मध्ये आढळून आला होता दरम्यान गुटखा कुठून आणला आणि कुठे घेऊन जात होता याचाही पोलिसांकडून पडताळा केला जात आहे.









