रत्नागिरी:- तालुक्यातील गावखडी कासार पऱ्या या रस्त्यावर निष्काळजीपणे दुचाकी चालवून एसटीला ठोकर देवून अपघात करण्याऱ्या स्वाराविरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशांत शामराव फोडकर (वय २५, रा. कशेळी-भंडारवाडी, ता. राजापूर, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. १४) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गावखडी-कासार पऱ्या येथील रस्त्यावर घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित सुशांत फोडकर हे दुचाकी (क्र. एमएच-०८ बी.जे ८३९७) घेऊन गोळप ते कशेळी असे जात असताना निष्काळजीपणे दुचाकी चालवून समोरुन येणारी एसटी (क्र. एमएच-२० बी एल ३३१२) च्या चालक बाजूकडील मागील चाकाला ठोकर देवून अपघात केला. या अपघातामध्ये दुचाकी स्वार सुशांत फोडकर हे जखमी झाले. या प्रकरणी महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल श्रद्धा करळकर यांनी पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.









