शोधमोहिम ठरली यशस्वी; पोलीस दलाचे विशेष प्रयत्न
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे येथे शनिवारी 20 जून रोजी सकाळच्या सुमारास दुर्दैवी घटना घडली होती.त्यामध्ये समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील पर्यटकांपैकी पाच जण समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले होते. यांतील पाचही जण बेपत्ता असताना पाचही जणांचे मृतदेह अखेर हाती लागले आहेत.
यातील प्रेम दीपक आदमाने वय वर्षे 19 यांचा मृतदेह शनिवारी सायंकाळच्या सुमारास आढळून आला तर उर्वरित चार जणांचा शोध सुरू असताना त्यातील यश रामेश्वर कांबळे याचा मृतदेह 20 जून रोजी रात्रीच्या सुमारास तर अनिकेत बंडू हिवराळे यांचा मृतदेह रविवारी 21 रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आढळून आला. तसेच आनंद राजू नरवडे वय वर्षे 20 याचा मृतदेह 21 रोजी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास आणि आदित्य राऊत याचा मृतदेह सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मालगुंड समुद्रकिनारी आढळून आला. हे सर्वजण जिल्हा संभाजीनगर ,तालुका पैठण येथील रहिवासी होते. समुद्रात बुडालेले हे पाच ही जण पाचही जण अविवाहित असून ते आपल्या मित्रांसमवेत देवदर्शन व पर्यटनासाठी शनिवारी वीज जून रोजी आले होते. दरम्यान गणपतीपुळे येथे समुद्रात पाच जण बुडाल्याची माहिती मिळताच रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर, अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी, रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे आदींनी गणपतीपुळे समुद्रकिनारी भेट देऊन शोध मोहीम तीव्र करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार जयगड पोलीस ठाण्याच्या वतीने सर्व पोलीस कर्मचारी ,होमगार्ड गणपतीपुळे ग्रामपंचायतचे जीव रक्षक स्थानी ग्रामस्थ व्यावसायिक अधिनियम शनिवारी झालेल्या घटनेपासून रविवार पर्यंत शोध मोहिमेत सभा घेऊन यशस्वीरित्या पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे या सर्वांचे गणपतीपुळे परिसरातून कौतुक होत आहे.









