राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त

खेड:- विधानसभा सार्वत्रिक निवडणुक – २०२४ च्या पार्श्वभुमीवर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क खेड विभागाने धडक कारवाई करत गावठी हातभट्टी निर्मिती केंद्रावर टाकलेल्या धाडीत तब्बल ९१ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई सोमवारी करण्यात आली.

कोल्हापुर विभागचे विभागीय उपायुक्त श्री.विजय चिंचाळकर, यांच्या सुचनेनुसार व श्रीमती किर्ती शेडगे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी यांचे मार्गदर्शनाखाली आचारसंहिता जाहिर झाल्यानंतर रत्नागिरी जिल्हयामध्ये आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुक – २०२४ शांततेत पार पाडावी यासाठी अवैद्य मद्याची तस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडुन गस्ती मोहिम राबविण्यात आली असता निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क खेड विभाग यांना गोपनीय बातमी मिळालेवरून मौजे वणोशी तर्फे पंचनदी गावच्या हददीत भिवबंदर येथील हातभटटी दारू निर्मिती केंद्रावर छापा टाकण्यात आला

या प्रकरणी संजय विद्याधर मोरे, रा. मु.पो. वणोशी तर्फे पंचनदी भिवबंदर ता. दापोली जि.रत्नागिरी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला

या धाडीत २०० लि. क्षमतेचे एकुण १२ प्लॅस्टिक बॅरलमध्ये अं. २४०० लि. गुळ व नवसागर मिश्रीत हातभटटी गावठी दारू गाळणे उपयुक्त कच्चे रसायनचा साठा, २० लि. तयार हातभटटी गावठी दारू तसेच दारू निर्मितीसाठी लागणारे साहीत्य असा एकुण रू. ९१ हजार ४५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

सदर कारवाईच्या वेळी निरीक्षक श्री. एस. बी. आरडेकर, दुय्यम निरीक्षक श्री. एन. बी. संखे, दुय्यम निरीक्षक श्री. एन. जे. गायकवाड, सहा. दु. निरीक्षक श्री. आर. बी. भालेकर, जवान श्री. ए. के. बर्वे व जवान-नि-वाहन चालक श्री. ए. व्ही. वसावे यांनी भाग घेतला. सदर गुन्हयांचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक श्री. एन. बी. संखे करीत आहेत.