खेडशी येथे पादचारी महिलेला धडक देऊन रिक्षा चालक फरार

रत्नागिरी:- खेडशी ते हातखंबा चालत जाणाऱ्या महिलांना अज्ञात रिक्षा चालकाने धडक दिली. यात एक महिला जखमी झाल्याची घटना 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास घडली. सुवर्णा विजय कुवेस्कर (45) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबतची फिर्याद तन्वी विजय कुवेस्कर (25, कापडी इन्क्लेव्ह, नवीन वसाहत खेडशी) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तन्वी कुवेस्कर आशा कापडी आणि सुवर्णा कुवेस्कर या खेडशी येथून रत्नागिरी ते हातखंबा रोडने चालत जात असताना हातखंबा बाजूकडून रत्नागिरीकडे येणाऱया एका रिक्षा चालकाने सुवर्णा कुवेस्कर यांना पाठीमागून धडक दिली. या धडकेत त्यांच्या डोक्याला व पाठीमागील बाजूस दुखापत झाली. अपघातानंतर रिक्षा चालक फरार झाला. या फरार रिक्षा चालकाचा पोलीस शोध घेत आहेत. या अपघाताची खबर तन्वी कुवेस्कर यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्यानंतर अज्ञात रिक्षा चालकावर भादविकलम 279, 337, 338, मोटर वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करत आहेत.