Sunday, July 26, 2026
spot_img
Home गुन्हेगारी खडपेवठार येथे अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा

खडपेवठार येथे अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील खडपेवठार येथील एका कॉम्प्लेक्सच्या समोर अंमली पदार्थाचे सेवन करण्याऱ्या तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. अदनान शफीक फणसोपकर (वय ३०, रा. कर्ला मशिदीचे पुढे, रत्नागिरी ) असे संशयित तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २३) रात्री आठच्या सुमारास निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित अदनान फणसोपकर हा तरुण खडपेवठार जाणाऱ्या रस्त्यावरिल रत्नसागर कॉम्प्लेक्सचे समोर अंमली पदार्थाचे सेवन करण्याचे साहित्य जवळ बाळगून अमली पदार्थाचे सेवन करत असताना आढळला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस हेड कॉन्स्टेबल वैभव मोरे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.