रत्नागिरी क्रांतीनगर येथे मटका-जुगारावर कारवाई

रत्नागिरी:- शहरातील क्रांतीनगर येथे विनापरवाना मटका जुगारावर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत जुगाराच्या साहित्यासह १ हजार १२ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. निहाल करीम होडेकर (वय २४) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २७) सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास क्रांतीनगर येथील रावजी चहाच्या मागील बाजूस उघड्यावर निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित होडेकर हा क्रांतीनगर येथे विनापरवाना मटका जुगार चालवत असताना सापडला. त्याच्याकडून साहित्यासह १ हजार १२ रुपयांची मुद्देमाल जप्त केला. पोलिस नाईक भालचंद्र मयेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.