९ तास ३५ मिनिटांत ९० किमी अंतर केले पार
रत्नागिरी:- जगातील सर्वात खडतर आणि
प्रतिष्ठित कॉम्रेड्स मॅरेथॉन स्पर्धा यंदा ८ जून २०२५ रोजी दक्षिण आफ्रिकेत पार पडली. या जागतिक स्तरावरील ९० किलोमीटर अंतराच्या मॅरेथॉन स्पर्धेत सांगली ज़िल्ह्यातील माधुरी मुळे गायकवाड यांनी केवळ ९ तास ३५ मिनिटांत ९० किमी अंतर पार करून भारतासाठी कांस्य पदक मिळवले. ही कामगिरी करणारी ती ९८ वर्षाच्या इतिहासात तिसरी भारतीय महिला ठरली आहे.
ही स्पर्धा पीटरमॅरिट्झबर्ग ते डर्बन या डोंगराळ आणि चढ-उतारांनी भरलेल्या अत्यंत आव्हानात्मक मार्गावर आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेच्या कठीणतेमुळे ती केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक क्षमतेचीही कसोटी मानली जाते. यंदाच्या स्पर्धेत जगभरातील २२,००० हून अधिक धावपटूंनी सहभाग घेतला होता.
माधुरी गायकवाड मागील दोन वर्षांपासून सातत्याने सराव करत होत्या. त्या सध्या लंडन येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास असून सध्या योगेश सानप यांच्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन घेत आहेत. त्या 11 जून रोजी लंडन येथे परतल्या . त्यांची ही यशोगाथा अनेक तरुणीना प्रेरणादायी ठरेलं. या कामागिरी बदल मुळे व गायकवाड परिवाराचे खूप जणांनी अभिनंदन केले









