कृषी विभाग होणार अद्ययावत; शेतकऱ्यांपर्यंत योजना आता एका क्लिकवर

रत्नागिरी:- गेल्या दोनवर्षात कोरोना प्रादुर्भावने रखडलेले कृषी विभगाचे डिजीटाझेशन यावर्षी यंदाच्या खरीप हंगमापासून सुरू झाले आहे. त्यामुळे अधिकाधिक योजना केवळ मोबाईलच्या एका क्लिकद्वारे शेतकर्‍यांपर्यत पोहचविण्याचा उद्देश कृषी विभागाने ठेवला आहे. यामध्ये नव्या योजनांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शेतकरी ऑनलाईन  संपर्कात आणण्याची मोहीम कृषी विभगाने सुरू केली आहे.

भूवन, हॉर्टसॅट, क्रॉपसॅट, महाडीबीटी, पोखरा, क्रॉप कटिंग, ई-पीक पाहणी, कृषक अशा अनेक योजनांद्वारे कृषी विभागाचे पेरणी ते खतांचा पुरवठा, कीड-रोगासंबंधीची माहिती देण्याचे कामकाज सध्या ऑनलाईन सुरू आहे. वास्तविक ही योजना कोरोना काळातच म्हणजे लॉकडाऊनमध्ये सुरू झाली होती. मात्र, त्यावर मर्याद आल्याने आता ती मोकळ्या वातावरणात सुरू करण्यात आली आहे. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवरून कृषी सहायकांच्या माध्यमातून गावनिहाय पातळीवरही मार्गदर्शन, सल्ला देण्याचे काम आता 24 तास सुरू आहे.

सध्या खतांच्या विक्रीबाबतच्या तक्रारींच्या अनुषंगानेही कृषी विभागाकडून ई-पॉज यंत्राद्वारे माहिती नोंद ठेवली जात आहे. क्रॉपसॅटच्या माध्यमातून भात, नाचणीस, तूर आदी पिकांच्या कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी हे उपयोजन वापरतात. हे सर्व प्रत्यक्ष दिलेल्या क्षेत्राची पाहणीही ऑनलाईन अथवा ऑफालईन करतात. त्याचे निरीक्षण नोंदवतात. कुठली कीड, रोग, त्याच्या प्रकाराची माहिती  आता त्यामुळे शक्य झाली आहे. फळपिकांबाबतची नोंदणी, कीड रोग सर्वेक्षण सल्ला व मार्गदर्शन अंतर्गत शेतकर्‍यांना कृषी वैज्ञानिकांचा थेट सल्ला, मार्गदर्शनही आता थेड  दिले जाते.