रत्नागिरी:- शहरातील कुवारबाव बाजारपेठ येथे निष्काळजीपणे दुचाकी चालवून रस्त्यातील खड्ड्यात पडून वृद्ध जखमी झाला व दुचाकीच्या नुकसानीस कारणीभूत झाला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात वृद्ध स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष रामचंद्र पावसकर (वय ६२, रा. साईनगर, कुवारबाव अष्टविनायक सोसायटी, रत्नागिरी) असे जखमी वृद्धाचे नाव आहे. ही घटना ही घटना १० जुलैला दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित वृद्ध संतोष पावसकर हे आपल्या ताब्यातील दुचाकी (क्र. एमएच-०८ एजे ४४०५ ही घेऊन रत्नागिरी ते हातखंबा रस्त्याने जात होते. कुवारबाव बाजारपेठ येथे निष्काळजीपणे दुचाकी चालवून दुचाकी रस्त्यावरिल खड्ड्यात जावून पडली. यामध्ये ते जखमी झाले. तसेच दुचाकीचे नुकसान झाले. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल महेंद्र खापरे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित वृद्धाविरुद्ध रविवारी (ता. १६) गुन्हा दाखल केला आहे.









