Saturday, July 18, 2026
spot_img
Home रत्नागिरी कुवारबाव येथील तरुणाचा आकस्मिक मृत्यू

कुवारबाव येथील तरुणाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- ताप आणि उलट्या होऊन बेशुद्ध पडलेल्या तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल कऱण्यात आले होते. अधिक उपचारासाठी एम. जी. एम. हॉस्पिटल कामोठे नवी-मुंबई येथे दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. मोहम्मद मुसलीम निजामुद्दीन (वय २२, रा. रत्नागिरी, रेल्वेस्टेशन कुवारबाव, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. ४) सकाळी साडेनऊ च्या सुमारास कामोठे नवी-मुंबई येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार खबर देणार शाहनवाज सरवर कलिमुद्दीन यांच्या सोबत तीन आठवड्यापासून रेल्वेस्टेशन येथे कोकण रेल्वेचे फरशी बसविण्याचे कामाला होता. त्याला ताप व उलट्या होऊन बेशुद्ध झाल्याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी एम. जी. एम हॉस्पिटल कामोठे नवी मुंबई येथे दाखल केले असता उपचार दरम्यान तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.