रत्नागिरी:- कोकण रेल्वेने मुंबईला जाणारा प्रवासी शहरातील कुवारबाव- आरटीओ ऑफिस जवळील रेल्वे रुळावर पडला. त्याच्या डोक्याला व हातापायांना दुखापत झाली. उपचारासाठी रेल्वे पोलिसांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. समीर मंगेश आडिवरेकर (वय ३८, रा. तुलसवडे, ता. राजापूर, रत्नागिरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १७) सकाळी आठच्या सुमारास आरटीओ ऑफिस जवळील ट्रॅक वर घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार समीर आडिवरेकर हे कोकण रेल्वेने राजापूर ते मुंबई असा प्रवास करत होते. कुवारबाव आरटीओ ऑफिस रेल्वे रुळावर त्यांचा तोल जावून पडले त्यांच्या डोक्याला व हातापायांना दुखापत झाली. रेल्वे पोलिसांनी माहिती मिळताच त्यांनी त्याला उपचारासाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.









