Monday, June 22, 2026
spot_img
Home गुन्हेगारी किरकोळ कारणावरून सख्ख्या भावाला लोखंडी पाईपने मारहाण

किरकोळ कारणावरून सख्ख्या भावाला लोखंडी पाईपने मारहाण

धामणदेवी येथील घटना

खेड:- तालुक्यातील धामणदेवी घडशीवाडी येथे भावा-भावातील वादातून मोठ्या भावाने धाकट्या भावावर लोखंडी पाईपने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आरोपी भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास फिर्यादी शत्रुघ्न विश्राम मोरे (वय ६१, रा. धामणदेवी घडशीवाडी) हे आपल्या घरी एकटेच होते. यावेळी त्यांचा मोठा भाऊ भरत विश्राम मोरे याने अचानक घरात प्रवेश केला. जुन्या वादातून किंवा किरकोळ कारणावरून भरत मोरे याने शत्रुघ्न यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
​वादाचे स्वरूप वाढल्याने आरोपीने शत्रुघ्न यांची गळपट्टी पकडून त्यांना घराबाहेर ओढत नेले. त्यानंतर आपल्या हातातील लोखंडी पाईपने शत्रुघ्न यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर आणि दंडावर जबर मारहाण केली. या हल्ल्यात शत्रुघ्न मोरे जखमी झाले आहेत.

​या मारहाणीप्रकरणी शत्रुघ्न मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, खेड पोलिसांनी आरोपी भरत विश्राम मोरे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ३३२(२), ३५१(२), ३५२ आणि इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.