Monday, May 11, 2026
spot_img
Home रत्नागिरी कार- दुचाकी अपघातात दोन महिलांसह चिमुकली गंभीर जखमी

कार- दुचाकी अपघातात दोन महिलांसह चिमुकली गंभीर जखमी

रत्‍नागिरी:- रत्‍नागिरी-पावस जाणाऱ्या रस्त्‍यावरील हॉटेल आनंद समोर रविवार 10 मे रोजी सायंकाळी 6.15 वा.सुमारास भरधाव कार आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दोन महिला आणि 6 वर्षीय मुलगी जखमी झाले. त्‍यांना उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तेजश्री अमित मोहिले (36),तीर्था मुरकर (65) आणि महिशा अमित मोहिले (6,सर्व रा.शांतीनगर,रत्‍नागिरी) अशी अपघातातील जखमींची नावे आहेत. रविवारी सायंकाळी तेजश्री मोहिले या आपल्या ताब्यातील दुचाकीवरुन तीर्था मुरकर आणि आपली मुलगी मोहिशा यांना घेउन रत्‍नागिरी ते पावस जाणाऱ्यास रस्त्‍याने जात होत्‍या. त्‍याच सुमारास समोरुन भरधाव वेगाने येणार कार (एमएच-05-एफजे-3198) वरील चालकाच ताबा सूटल्यामुळे त्‍याने समोरुन येणाऱ्या मोहिले यांच्या कारला धडक देत हा अपघात केला. ही धडक इतकी जारेदार होती कि,त्‍यामुळे दुचाकीचा पूर्ण चुराडा झाला असून कारच्याही दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. दरम्यान अपघातातील जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद रुग्णालयातील पोलिस चौकित करण्यात आली असून अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.