Thursday, September 17, 2026
spot_img
Home संगमेश्वर कार्यक्रमाच्या स्टेजवर आढळला प्रौढाचा मृतदेह

कार्यक्रमाच्या स्टेजवर आढळला प्रौढाचा मृतदेह

संगमेश्वर:- तालुक्यातील नांदळज गावात श्री सुखाई देवी मंदिर परिसरातील कार्यक्रमाच्या स्टेजवर एका ५२ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. काळीदास किसनराव देशमुख (वय ५२, रा. मु.पो. गौर, ता. कळम, जि. धाराशिव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काळीदास देशमुख हे विविध ठिकाणी सेंटरिंग, प्लास्टर तसेच लादीचे काम करण्यासाठी जात असत. त्यांना दारूचे व्यसन असल्याची माहिती पोलिस नोंदीत नमूद करण्यात आली आहे. १५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजण्यापूर्वी नांदळज गावातील श्री सुखाई देवी मंदिर परिसरातील कार्यक्रमाच्या स्टेजवर ते अंथरुणावर उपडे पडलेल्या अवस्थेत दिसून आले. गावातील जयराम भिकाजी रहाटे यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर घटनेची माहिती संबंधितांना देण्यात आली. त्यानंतर या घटनेची नोंद पोलिसांकडे करण्यात आली.

या घटनेमुळे नांदळज परिसरात काही काळ खळबळ उडाली. देशमुख यांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. या प्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी बीएनएसएस कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. आमृ क्रमांक ३७/२०२६ अशी या प्रकरणाची नोंद असून, मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय तपासणी व अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.