रत्नागिरी:- कामावर जा असे सांगितल्याच्या रागातून पत्नीच्या डोक्यात लाकडी पाट मारून जखमी केले. ही घटना शनिवार 28 मे रोजी सायंकाळी 7.30 वा.गोडाऊन स्टॉप येथे घडली असून पती विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलेश बाळकृष्ण बेटकर (40, मूळ रा.असोडे खानू, लांजा सध्या रा.गोडाऊन स्टॉप, रत्नागिरी ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित पतीचे नाव आहे.
पतीच्या विरोधात पत्नी सानिका निलेश बेटकर (39,मूळ रा.असोडे खानू, लांजा सध्या रा.गोडाऊन स्टॉप, रत्नागिरी ) हिने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. निलेश कामावर गेला नाही म्हणून सानिका त्याला उठवत होती. परंतु निलेश उठला नाही तेव्हा तिने त्याला कामावर जा असे सांगितले. याचा राग आल्याने निलेशने शेजारी राहणाऱ्या भारती सूर्यवंशी यांच्या घरातील पाट सानिकाच्या डोक्यात मारून तिला शिवीगाळ केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.









