काजरघाटी धार येथे मद्यपान करणाऱ्या 4 तरुणांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरानजीकच्या काजरघाटी धारेवरील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या चार तरुणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

अमर प्रभाकर मुरकर (वय ३२, रा. कोकणनगर, रत्नागिरी), प्रथमेश संतोष लाखण (वय २९, रा. आदर्श वसाहत कारवांचीवाडी, रत्नागिरी), तुषार संतोष लाखण (वय २४, रा. आदर्शवसाहत, कारवांचीवाडी, रत्नागिरी) व प्रसाद शंकर बंडबे (वय २४, रा. शांतीनगर, रसाळवाडी, रत्नागिरी) अशी संशयित तरुणांची नावे आहेत. ही घटना रविवारी (ता. २६) रात्री च्या सुमारास कुवारबाव-काजरघाटी धार येथे निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित तरुण रात्री काजरघाटी धार येथे मद्यपान करत असताना सापडले. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल राहूल जाधव यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी चार संशयित तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.