Monday, September 14, 2026
spot_img
Home रत्नागिरी कर्ला मशिदीजवळून वृध्द महिला बेपत्ता

कर्ला मशिदीजवळून वृध्द महिला बेपत्ता

रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात नोंद

रत्नागिरी:- शहरातील कर्ला मशिदीजवळ राहणाऱ्या ७० वर्षीय वृद्ध महिला घर कोणालाही न सांगता निघून गेल्याची घटना घडली असून, त्या अद्याप घरी परतलेल्या नाहीत. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुलताना इस्माईल शेख (वय ७०, रा. घर नं. ७८/अ, कर्ला मशिदीजवळ, रत्नागिरी) असे बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची मुलगी निलोफर जहिर मुकादम (वय ४१) यांनी १२ सप्टेंबर रोजी रात्री शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास सुलताना शेख या राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता बाहेर पडल्या. त्यानंतर संध्याकाळपर्यंत त्या घरी परतल्या नाहीत. नातेवाईकांनी आणि कुटुंबियांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, मात्र त्यांचा कुठेही पत्ता लागला नाही.

कुटुंबीयांच्या फिर्यादीवरून भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १४० (३) नुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक अधिक तपास करत आहेत. वृद्ध महिलेबाबत काही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ रत्नागिरी शहर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.