कर्जवसुलीसाठी गेलेल्या बँक कर्मचाऱ्याला मारहाण

तिघांविरुद्ध ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहरालगतच्या मिरजोळे एमआयडीसी येथे कर्जवसुलीसाठी गेलेल्या बँक कर्मचाऱ्याला शिवीगाळ व दमदाटी करत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडल़ी लक्ष्मण गणु म्हात्रे असे मारहाण करण्यात आलेल्या बँक कर्मचाऱ्याचे नाव आहे.

याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी तिघा संशयितांविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता तसेच ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आह़े
अल्ताफ संगमेश्वरी, हिदायद इस्माईल वस्ता व हनिफ हिदायद वस्ता अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. गुन्ह्यातील माहितीनुसार हिदायद वस्ता याने बँकेतून कर्ज घेतले होते. या कर्जाची वसुली करण्यासाठी 24 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास लक्ष्मण म्हात्रे हे आपल्या पथकास हिदायद वस्ता याच्या मिरजोळे एमआयडीसी येथील घरी गेले होते. कर्ज वसुलीसाठी आलेले पथकाशी हिदायद वस्ता हा वाद घालू लागल़े
वाद सुरु असताना अल्ताफ संगमेश्वरी हा त्याठिकाणी आला. यावेळी संशयित आरोपी यांनी लक्ष्मण म्हात्रे यांना दमदाटी, शिवीगाळ व मारहाण केल़ी अशी तक्रार रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.