Thursday, June 11, 2026
spot_img
Home गुन्हेगारी करंजाणीत तरुणाचे अपहरण करून मारहाण

करंजाणीत तरुणाचे अपहरण करून मारहाण

दापोली:- तालुक्यातील करंजाणी येथे बसस्टॉपवर एका युवकाला पैशाच्या देवघेवीवरून जबरदस्तीने मोटारीत बसवून अपहरण करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दापोली पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गौराबाई बसवराज पवार (वय ५०, रा. करंजाणी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यांचा मुलगा किरण बसवराज पवार (वय ३०) याचे संशयितांनी अपहरण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ५ फेब्रुवारी २०२६ ला दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास करंजाणी बसथांब्यावर किरण पवार उभा असताना संशयित शब्बीर मांडलेकर (वय ६०) व त्याच सोबत जिशान शब्बीर मांडलेकर (२८), सुबान शब्बीर मांडलेकर (२१) आणि सरजीन लियाकत मांडलेकर (१८, सर्व रा. म्हाप्रळ, ता. मंडणगड) आणि अन्य तिघेजण तिथे आले. त्यांनी तू पैसे दिले नाहीस तर तुला मारून टाकू, अशी धमकी दिली. त्यानंतर त्यांनी किरण पवार याला जबरदस्तीने मोटारीतून बसवून पैशांची मागणी करून मारहाण केली.