कंपनी मालकाची अडीच लाखाची ऑनलाईन फसवणूक

चिपळूण:- लोटे येथील एका कंपनी मालकाची २ लाख ४४ हजाराची ऑनलाईन फसणूक झाल्याची घटना १८ नाव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी शनिवारी चिपळूण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद राजकुमार पुखराज जैन (५२, मूळ-कोल्हापूर सध्या-राधाकृष्ण नगर चिपळूण) यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हा दाखल झालेल्या त्या अज्ञातानाने राजकुमार जैन यांच्या कंपनीचे मागील पाण्याचे बिल अपलोड झालेले नसल्याने ते कापणार होणार असल्याचे नमुद असलेला मॅसेज जैन यांच्या व्हॉटसअॅपवर केला. शिवाय त्यांना अॅप पाठवून ते डाऊनलोड करण्यास सांगून व त्यामध्ये माहिती भरण्यास सांगितली. या अॅपवर जैन यांनी त्याचे डेबीड कार्डची माहिती भरली असताना त्यांच्या अकाउंटमधून ४५ हजार, १ लाख १९ हजार असे ट्रान्सॅक्शन होऊन जैन यांची एकूण २ लाख ४४ हजार अशी ऑनलाईन फसवणूक झाली. हा प्रकार त्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शनिवारी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.