Thursday, September 10, 2026
spot_img
Home संगमेश्वर ओझरखोल येथील विवाहितेचा आकस्मिक मृत्यू

ओझरखोल येथील विवाहितेचा आकस्मिक मृत्यू

संगमेश्वर:- तालुक्यातील ओझरखोल येथील ३५ वर्षीय विवाहितेचा उपचारादरम्यान आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, ८ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली. मानसी जठ्यार (३५, रा. ओझरखोल, संगमेश्वर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

मानसी जठ्यार यांना पोटात दुखत असल्याने संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती लक्षात घेऊन ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी अधिक उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी श्वसनाचा त्रास जाणवू लागला. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

मानसी जठ्यार यांच्या पश्चात पती, सासू, सासरे आणि दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या एका मुलीचे वय १२ वर्षे, तर दुसऱ्या मुलीचे वय ६ वर्षे आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने ओझरखोल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.