डिझेल दरवाढीचा मोठा फटका
रत्नागिरी:-पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे एसटी महामंडळाला मालवाहतूक करण्यासाठी तिसर्यांदा दरवाढ करावी लागली आहे. एसटीने शंभर किलोमीटरच्या आत असलेल्या मालवाहतुकीच्या भाड्यात चार रूपयांची दरवाढ केली आहे.
प्रतिकिलोमीटर दर 46 रूपये झाला आहे.
लॉकडाउनमुळे एसटीतून प्रवासीसेवा बंद होती. यामुळे मालवाहतूक करण्यासाठी परिवहन विभागाने परवानगी दिली. यासाठी एसटीने जुन्या बस मालवाहतुकीसाठी तयार करून घेतल्या आहेत. ही सेवा सुरू झाल्यानंतर रत्नागिरी विभागाला मालवाहतुकीतून एक कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. सेवा सुरू करण्यात आली तेव्हा 100 किलोमीटरसाठी 38 रूपये प्रति किलोमीटर दर होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दरवाढ होत राहिल्याने, महामंडळाने 100 किलोमीटरसाठी 42 रूपये दर केला. त्यानंतरही अनेक व्यापार्यांनी या सेवेचा लाभ घेतला. आता तो 42 वरून 46 रूपये करण्यात आला आहे.









