Sunday, October 11, 2026
spot_img
Home गुन्हेगारी उद्यमनगर येथे मटका जुगारावर पोलिसांची छापा; दोघांविरुद्ध गुन्हा

उद्यमनगर येथे मटका जुगारावर पोलिसांची छापा; दोघांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील उद्यमनगर येथील एका बंद टपरीच्या आडोशाला तर शिवाजी स्टेडियम येथे मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. शहर पोलिस ठाण्यात दोघा संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौस्तुभ दिलीप साळुखे (वय ३३, रा. जुने आरटीओ ऑफिस जवळ नाचणे रोड, मारुती मंदिर रत्नागिरी) व प्रतिक सुभाष भरणकर (वय ३८, रा. मुरुगवाडा, मिऱ्यारोड रत्नागिरी) अशी संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ८) सायंकाळी सव्वा सहाच्या व सव्वा आठच्या सुमारास निदर्शनास आल्या.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित विनापरवाना मटका जुगार खेळ खेळवत असताना सापडले. संशयित प्रतिक भरणकर यांच्याकडून साहित्यासह ९७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल शरद कांबळे व अमोल भोसले यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.