रत्नागिरी:- शहरातील पडवेकर कॉलनी येथील बंगल्यात घुसून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास केली. या चोरी प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात शहर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुमारे ४५ हजार रु. किंमतीचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे.
पडवेकर कॉलनी येथे श्री. मार्टिंन फर्नांडिस हे वृद्ध दांपत्य रहाते. बुधवारी रात्रच्या सुमारास नेहमी प्रमाणे जेवण झाल्यानंतर ते आपल्या बेडरुममध्ये झोपण्यासाठी गेले होते. यावेळी बंगल्याच्या मुख्य दरवाज्याला असलेल्या ग्रिलला कुलूप लावून चावी खिडकीत ठेवली होती.
मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी खिडकीतील चावीच्या मदतीने कुलूप उघडून आतील पहिल्या खोलीच्या दरवाज्याची कडी तोडून आत प्रवेश केला. कपाटातील दोन सोन्याच्या अंगठ्या, रिंग जोड, ८ हजार रोख, मोबाईल असा ऐवज लंपास केला.









