Friday, June 5, 2026
spot_img
Home राजकीय आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! बाळ माने यांची निवडणुकीतून माघार

आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! बाळ माने यांची निवडणुकीतून माघार

विधान परिषदेवर अनिकेत तटकरेंच्या बिनविरोध निवडीची शक्यता

रत्नागिरी:- राज्यातील 17 स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघासाठी 18 जूनला निवडणूक होणार आहे. गुरुवारी निवडणुकीतून अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि याच पार्श्वभूमीवर राज्यात विविध मतदारसंघात घडामोडी घडताना दिसत आहे. याचदरम्यान, कोकणात सगळ्यांत मोठा ट्विस्ट निर्माण झाला.

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषदेतील शिवसेना महाविकास आघाडीचे (शिवसेना ठाकरे गट) उमेदवार सुरेंद्र उर्फ बाळ माने भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्यासोबत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झाले. त्यानंतर बाळ माने उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे कोकण विधान परिषद निवडणुकीमध्ये शेवटच्या दिवशी इंटरेस्टिंग ट्विस्ट निर्माण झाला.

कोकण विभाग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेच्या जागेसाठी चुरस निर्माण झाली होती. मात्र आता कोकणमधील विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार आहे. महायुतीकडून राष्ट्रवादीने अनिकेत तटकरे यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाच्या बाळ माने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. परंतु ऐनवेळी बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने कोकणातील विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार आहे.