रत्नागिरी:- शहरातील आंबेशेत-कुर्टेवाडी येथे वृद्धाला मारहाण करणाऱ्या तिघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिता शंकर बाचरे, रसिका मनोज बाचरे, आदेश मनोज बाचरे (सर्व रा. कुर्टेवाडी, आंबेशेत, रत्नागिरी ) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना रविवारी (ता. ५) सकाळी सव्वा आठच्या सुमारास कुर्टेवाडी-आंबेशेत येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी गणपत विठोबा बाचरे (वय ७५, रा. आंबेशेत, रत्नागिरी) यांची पत्नी दर्शना व सुन रस्मी असे घराचे मागील बाजूस चौथऱ्यावरील मोकळ्या जागेत भिंत घालण्यासाठी कामगार बोलावले असल्याने चरी मारत असल्याचा राग मनात धरुन संशयित सनिता व रसिका यांनी फिर्यादी यांची त्नी दर्शना व सून रश्मी यांना हाताच्या थापटाने मारहाण केली तर आदेश बाचरे याने हातातील बॅटने फिर्यादी यांच्या पाठीवर डोक्यावर मारहाण केली. यावेळी फिर्यादी यांचा मुलगा प्रशांत हा त्यांचे भांडण सोडविण्यास आला असता त्याला हाताच्या थापटाने मारहाण केली. या प्रकरणी गणपत बाचरे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.