Wednesday, May 13, 2026
spot_img
Home गुन्हेगारी अवैध दारू वाहतूकप्रकरणी रिक्षाचालकावर कारवाई

अवैध दारू वाहतूकप्रकरणी रिक्षाचालकावर कारवाई

2 लाखांचा मुद्देमाल जप्त

खेड:- खेड पोलिसांनी खेड-भरणे रस्त्यावर गोळीबार मैदानजवळ एका ऑटोरिक्षातून अवैधपणे विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या चालकाला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून २ लाख ३८ हजार ७४० रुपये किमतीचा विदेशी आणि देशी दारूचा साठा तसेच ऑटोरिक्षा जप्त करण्यात आली. ही कारवाई काल, ९ मे रोजी दुपारी २:५० वाजता करण्यात आली.

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश राजेंद्र पवार यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, आरोपी नादीर इस्माईल मेटकर (वय ३२, रा. मुस्लिम मोहल्ला कोंडीवली) हा त्याच्या ताब्यातील एम.एच.-०८/बी.सी./३१११ क्रमांकाच्या काळ्या-पिवळ्या रंगाच्या बजाज कंपनीच्या ऑटोरिक्षामधून विदेशी दारूची वाहतूक करत असताना मिळून आला. त्याच्याकडे दारू वाहतुकीचा कोणताही परवाना नव्हता.

पोलिसांनी जप्त केलेल्या मालामध्ये खालील वस्तूंचा समावेश आहे- १६,३८० रुपये किमतीच्या ६५० मिलीच्या ट्युबर्ग स्ट्रॉन्ग प्रीमियम बिअरच्या सीलबंद १२ बाटल्या, ६,६५० रुपये किमतीच्या १८० मिलीच्या रॉयल चॅलेंज फिनेस्ट प्रीमियम व्हिस्कीच्या सीलबंद ३५ बाटल्या, २,९४० रुपये किमतीच्या ६५० मिलीच्या कार्ल्सबर्ग स्ट्रॉन्ग प्रीमियम बिअरच्या सीलबंद १२ बाटल्या, ३,९६० रुपये किमतीच्या ६५० मिलीच्या लंडन पिल्सनर स्ट्रॉन्ग प्रीमियम बिअरच्या सीलबंद २४ बाटल्या, ७,२०० रुपये किमतीच्या २७५ मिलीच्या ब्रिंगार बिअरच्या सीलबंद ४८ बाटल्या, १,६१० रुपये किमतीच्या १८० मिलीच्या देशी संत्रा जीएमच्या सीलबंद २३ बाटल्या, २,००,००० रुपये किमतीची एम.एच.-०८/बी.सी./३१११ क्रमांकाची काळ्या-पिवळ्या रंगाची बजाज कंपनीची ऑटोरिक्षा, आरोपी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपी नादीर मेटकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.