खेड:- अल्पवयीन युवतीवर अत्याचार करत अश्लील फोटो व्हायरल करून ब्लॅकमेल करणाऱ्या अजय नामदेव पवार (२५, मूळ गाव जयसिंगपूर-कोल्हापूर) याला येथील पोलिसांनी बुधवारी अटक केली. पीडित युवतीस शिवीगाळीसह ठार मारण्याची धमकी दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता दोन दिवस पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.
मार्च-एप्रिल २०२१ पासून पुढे पीडित युवतीशी ओळख झाल्यानंतर दोन महिन्यांनी तिला आत्याच्या घरी बोलावले होते. पीडित युवती येथे आली असता तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत अत्याचार केला. या बाबत. वाच्यता केल्यास शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली होती. एवढ्यावरच न थांबता ८ जून २०२५ रोजी एका तरुणाशी तिचे लग्न जमले असता त्याच्या इस्टाग्रामवर अश्लील फोटो व्हायरल करत ब्लॅकमेल केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
हा घडलेला सारा प्रकार पीडित युवतीने आई-वडिलांच्या कानावर घातल्यानंतर मंगळवारी सायंकाळी उशिरा पोलीस स्थानक गाठत तरुणाविरोधात तक्रार दाखल केली. येथील पोलिसांना रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. पीडित युवती अल्पवयीन असतानाही तिच्या मनाविरूद्ध शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी संशयितावर बुधवारी अटकेची कारवाई करण्यात आली. संशयिताचा मोबाईलही जप्त करण्यात आल्याचे समजते. अधिक तपास दापोलीचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे करत आहेत.