Sunday, May 3, 2026
spot_img
Home खेड खेड येथे रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

खेड येथे रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

खेड:- कोकण रेल्वे मार्गावरील खेड तालुक्यातील अलसुरे गावाच्या हद्दीत मालगाडीची धडक बसून एका ३५ ते ४० वर्षीय अनोळखी पुरुषाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी दि. १३ मार्च रोजी रात्री ९:३० ते १०:०० वाजेच्या सुमारास घडली असून, शनिवारी पहाटे याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, अलसुरे गावातून जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर मैल दगड क्रमांक १००/०९ जवळ हा अपघात घडला. एक मालवाहू रेल्वे जात असताना हा व्यक्ती रुळावर आल्याने त्याला जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात मयताच्या डोक्याला, छातीला, दोन्ही हातांना आणि पायांना गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळंबणी (ता. खेड) येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.